बांद्रा स्टेशन बाहेर.....

Started by विक्रांत, August 04, 2013, 06:55:47 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


माणसांची गर्दी
भोंगातील आवाज 
श्रद्धेने रस्त्यावर
चाललेले नमाज
रंग बिरंगी डिश
ठेवलेल्या सजून
गरम मसाल्यांचे
गंधीत वातावरण
कडक बंदोबस्त
सावध खाकीधारी
इवल्या शेरवानीत
मुले गोरी गोरी
हिरव्या पताका
सुरमी नजरा
कर्मठ गंभीर
अल्ला हू चा नारा 
नवे कोरे बुरखे
उत्साहाने भरले
बाजारी गढलेले
हात मेहंदी सजले
आलो मज वाटे
दुसऱ्या जगात
बसलो अवघे
कौतुकाने पाहत

विक्रांत प्रभाकर

Ajay Pande

Kay Vikrant aagdi Mojkya shabdat mandla aahes bandra.... ;) ;)


aspradhan

वा फारच छान !आपण धर्माच्या पलीकडे जाऊन सुंदर वर्णन केलात या बद्दल आपलं मनापासून अभिनंदन !!!