दगडाचा देव तू .......!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, August 06, 2013, 11:12:12 AM

Previous topic - Next topic
दगडाचा देव  तू
दगडाचे  काळीज तुझे 
भावनांत गुंतुनी विसरलास तुझे   देवपनही.........

तुझ्या गाभारयात  येताना
आता परिस  बनावं लागतं
मी एक क्षुद्र रे मी कोळश्यासमान
तप्त  ह्या लोभी दुनियेच्या
जळतो आहे  मी  जन्मताच ...........

देव तू  श्रीमंताचा
मी तर साधा भिकारी
श्रीफळ काय वाहू  तुला
खिश्यात राहिली नाही रे कवडी.........

दगडाचा  देव तू 
मानायचे  तरी दान  मी कसे ...?
संकट दारिद्र्याचे हि  तरुण घे एवढेच मागणे आहे  रे माझे.......

देव तुला बघताना  आता डोळेही  थकलेत
तुझ्याकडे मागून देवा  सरले हे आयुष्य माझे ..........
-
लेखन : ණ
• ©प्रशांत .डी. शिंदे•

मिलिंद कुंभारे