प्रिये

Started by Rahul Kaware, August 06, 2013, 04:47:49 PM

Previous topic - Next topic

Rahul Kaware

प्रिये ,
उद्या तू कुठं अन मी कुठं असेन...
तुझ्या आठवणींत मी मात्र बेजार असेन....
जसा गोड पाण्यातला मासा,
खाऱ्या पाण्यात तडफडत असेन...

हे दिवस माझे आहेत, वाया घालवू नकोस...
प्रीतीला माझ्या आकर्षणाचं दूषण लावू  नकोस...
मला तुझ्या आठवणींच्या फुलांचा गजरा माळायचाय,
अन पुढं कधीतरी स्वप्नांत, तुझ्या केसांत तो गुंफायचाय.
आता फक्त तुझ्या अंगणातली आठवणींची फुलं वेचायला नाही म्हणू नको....

"तू माझी हो" असं मी म्हणणार नाही !
पण "मी तुझी होणारच नाही" असं म्हणू नको....
उद्या तू कुठ अन मी कुठ असेन...
पण एक सांगतो...
शपथेवर...
मी तुझ्यासाठी खुळा होतो...
खुळा आहे !
अन खुळाच असेन.... !!!


- राहुल राजेंद्र कावरे
  अमरावती

http://rahulkawarekavita.blogspot.in/

MK ADMIN

krupaya title suddha marathi madhye tyep karave.....I have edited the post. Request you to take care from next time.

Rahul Kaware

dhanyavad!
pan titha type navhata karata yet mhanun nahi kela....
tyabaddal jara margadarshan milala tar bara hoil...
punascha dhanyavad!!

Maddy_487


Rahul Kaware

dhanyavad maddy...
ani tuzi kavita pan avadli...

मिलिंद कुंभारे


Rahul,

फारच छान....... :)


वेडा कि खुळा

Rahul Kaware

#6
milind sir,
khulach!!
karan ved utarata, khula to khulach rahto...