एक वेदना...

Started by Ankush S. Navghare, Palghar, August 09, 2013, 04:35:08 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

एक वेदना अंतरीची
एक तुझ्या मनीची
एक वेदना हृदयाची
एक तू नसण्याची
एक वेदना नयनांची
एक तू न दिसण्याची
एक वेदना भावनांची
एक तू अबोला धरण्याची
एक वेदना पापण्यांची
एक दुखाश्रू येण्याची
एक वेदना तळमळीची
एक तू न भेटण्याची
एक वेदना आत्म्याची
एक भिन्न देह असण्याची
एक वेदना अपेक्षांची
एक पूर्ण न करण्याची
एक वेदना आपुलकीची
एक उपकार दाखवण्याची
एक वेदना जगण्याची
एक जगत जळण्याची
एक वेदना मरण्याची
एक मरत जगण्याची
एक वेदना प्रेमाची
एक दया दाखवण्याची
एक वेदना दूर होण्याची
एक
तू माझी नसण्याची...
तू माझी नसण्याच...

... प्रजुन्कुश
... Prajunkush

www.facebook.com/ankush.navghare.353

Vishwasrao


Ankush S. Navghare, Palghar