आभाळ

Started by Mrs. Sanjivani S. Bhatkar, August 12, 2013, 03:02:31 PM

Previous topic - Next topic

Mrs. Sanjivani S. Bhatkar

आभाळ

आभाळ्यातल्या  चांदण्या थेंबांच्या
रूपाने अलगद जमिनीवर येतात
तेथे हिरवयीने नटलेल्या पाचूंची
विपुल बने फुलवून जातात

नभातली लाख लाख नक्षत्र
सुरेख सुंदर गारा होतात
जमिनीवर येताच काचेच्या
मण्यांसारख्या त्या फुटून जातात

अंबरातून पावसाच्या
झरझर सरी कोसळतात
त्यांच्या दारावरती विजा
हट्टाने लोळण घेतात

चिमण्या  आणि पाखरे
मुक्तपणे आभाळभर फिरतात
पाऊस पडू लागल्यावर
ती हळूच घरट्यात शिरतात

गगनावरती चंद्र आणि सुर्य
लपाछपीचा  खेळ खेळतात
तारका  आणि चांदण्याही
मग त्यांना येऊन मिळतात

गगनावरती माझे स्वास
एक भरारी मारतात
जीवनातली  सारी  दुःख
हळुवार  बाजूला सारतात


               -     सौ  संजिवनी संजय भाटकर  :)