जिव्हाळा

Started by SANJAY M NIKUMBH, August 13, 2013, 06:38:43 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

जिव्हाळा
========
हा जीव गुंतून पडतो
आपण जेथे काम करतो
तिथली प्रत्येक वस्तू
जणू आपली होऊन जाते
अन आपण त्या वास्तूचे
गुलाम होऊन जातो .........

पहाट होताच ठरलेल्या वेळी
पाय तिकडे वळतात
आपण पोहचण्या अगोदरच
मनाने पोहोचलेले असतात

तिथल्या माणसांचा जिव्हाळा
मनास लागलेला असतो
कुठल्यातरी नात्यानं
त्यांच्याशी बांधलेले असतो

बदली झाल्यावर तिथून निघतांना
म्हणून पाय जडावतात
नकळत डोळ्यांच्या पापण्या
आतून हळूच ओलावतात

आठवणींना उराशी कवटाळून
नवीन ठिकाणी जावचं लागतं
थोड्याच दिवसात त्या गोत्यावळ्याला
आपलं करून टाकावं लागतं

मग होतं अधूनमधून
जुन्या माणसांना फोन करणं
जरी कधी गेलो तिथे
आपण असतो क्षणभरचं पाव्हणं

आयुष्य असचं जगावं लागतं
जुनं कवटाळून नवं स्वीकारावं लागतं
पण असं कुणीतरी भेटतच
जे कायमचा जिव्हाळा लावून टाकतं .
-------------------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि . ६ . ८ . १३ वेळ : ६ . ३० स .