एक पावसाळी संध्याकाळ

Started by kavita.sudar15, August 14, 2013, 10:04:09 PM

Previous topic - Next topic

kavita.sudar15

एक रम्य अशी ती सायंकाळ,
  पाऊसाचा हि सुटलेला ताळ.
थंडगार असा बेभान वारा,
  दोघांनाही स्पर्शणार्या पाऊस धारा....
तो आणि ती प्रेमात होते धुंध,
   मातीलाही सुटलेला सुगंध.....
त्याच्या अन  तिच्या प्रेमात पाडत होते भर,
  एकमेकांत हरवून सोडणारी ती श्रावणसर.....
त्यातच तिच्या त्या नजरेचा एक कटाक्ष,
  साऱ्या सृष्टीचे वेधत होते लक्ष.....
पाऊसात भिजून दोघही शोधू लागले निवारा,
  थंडीने अन लाजेने अंगावर शहारा.....
चिंब भिजून हरपलेले देहभान,
  निसर्गही जणू त्यांच्यासाठी गात होते प्रेमगाण.....
   निसर्गही जणू त्यांच्यासाठी गात होते प्रेमगाण.....!!!! @ कविता @   

Rachana Thite