सौंदर्य ….

Started by SANJAY M NIKUMBH, August 15, 2013, 06:42:55 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

सौंदर्य .... 
---------------
तू बघितलंस कां
तुझं निर्मळ हास्य
तुझा फुललेला चेहरा
सुंदर मन ल्यालेला
नाही नां .........
पण मी बघितलाय
अन बघतो
म्हणून तर तुझ्यावर
जीवापाड प्रेम करतो
तुझ्यात गुंतण्याच कारण
तो चेहराच तर आहे
म्हणून माझं प्रेमही
तुझ्या चेहऱ्यासारखं
निष्पाप आहे .........
तुला कळलं कां
जगातील सर्वात सुंदर स्री
तुला कां म्हणतो ते .

==================
संजय एम निकुंभ , वसई
दि. १५ . ८ . १३ वेळ : ६.०० स.