आज माझ्या जिवापाड केलेल्या प्रेमाचा बळी घेतला कोणीतरी.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 15, 2013, 09:29:22 PM

Previous topic - Next topic
आज माझा पुर्णपणे,
विश्वास तोडला कोणीतरी,
माझ्या मनाला खूप दुःख,
देवून गेलं कोणीतरी.....

माझ्या नाजूक ह्रदयाचे,
शेकडो तुकडे करुन गेलं कोणीतरी,
एकेकाळी ती माझी,
लागत होती कोणीतरी.....

पण ?????

आज तिचं बोलली मिळेल रे,
तुला माझ्यापेक्षा चांगली दुसरी कोणीतरी,
विचार करत होतो मी,
का आज असे बोलली असेल ती.....

कदाचित तिलाही आवडायला लागला,
असेल दुसरा कोणीतरी,
असे तिने बोलायला नव्हतं,
पाहिजे होतं आजतरी.....

कारण ?????

आम्ही ही ऐकामेकांनवर,
जिवापाड प्रेम केलं होतं कधीतरी,
मनापासून केलेलं खरं प्रेम,
विसरता येत नाही सहजा-सहजी.....

म्हणूनचं तीही पसतावेल,
तिलाही येईल माझी आठवण एकदातरी,
तिलाही येईल माझी आठवण,
तीही रडेल तेव्हा मी असेल देवाघरी.....

पण ?????

मनाला माझ्या नेहमी,
एकचं दुःख सतवत राहील,
का अशी वागली ती माझ्याशी,
की मी जिवापाड केलेलं प्रेम कमी पडले का कुठेतरी.....

मी ईतका वाईट आहे का हे,
मला सांगाल का कोणीतरी,
पुन्हा मी आयुष्यात प्रेम करु,
शकणार नाही कुणावरही.....

कारण ?????

आज माझ्या जिवापाड केलेल्या प्रेमाचा बळी घेतला कोणीतरी.....

आज माझ्या जिवापाड केलेल्या प्रेमाचा बळी घेतला कोणीतरी..... :'( :'( :'(


_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....


Çhèx Thakare

एकेकाळी ती माझी,
लागत होती पण आता मला म्हणते कोणीतरी.....

अस हव होत तिथे

भावना छान होत्या शब्दात अजून थोड निट सावरायला हव होत  :-)