डोळ्यांत वेदना अन

Started by केदार मेहेंदळे, August 16, 2013, 04:39:06 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

  वृत्त - आनंदकंद.
लगावली ''गागाल गाल गागा''

डोळ्यांत वेदना अन ह्रिदयात वार आहे
मरणा कडेच माझे जगणे उधार आहे

लपवून आसवांना जगतो हजार मरणे
खोटेच हासणे हा भलता थरार आहे

दुख्खा शिवाय आता उरले कुणी न येथे
विरहात दुख्ख माझा मोठाच यार आहे

जगतो तरी कशाला कळतेच ना अताशा
जगण्यास आठवांचा मोठाच भार आहे

सोडेन ना कदापी मी साथ आसवांची
नियती सवेच माझा झाला करार आहे

तुटले कधीच घरटे माझे कुणी न येथे
गुत्ता ठिकाण आता दारूच प्यार आहे


केदार.........




Ankush S. Navghare, Palghar


मिलिंद कुंभारे


केदार दादा,

क्या बात ...... फारच छान ......
आवडली गझल ........अगदीच वृत्तामध्ये..... :) :) :)