ओढ तुज मिलनाची

Started by मिलिंद कुंभारे, August 17, 2013, 02:34:36 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

ओढ तुज मिलनाची .....

कुठे कुठे शोधू तुला
रिता सारा आसमंत
तारकाहि मंदावल्या 
शांत सागरी किनारा ....

सुना सुना राजवाडा
कोमेजला पारिजात 
ओढ तुज मिलनाची
कि पाठलाग नुसता ......

निळ्याशार डोळ्यांत ह्या
समुद्र उधाणलेला
शोधू कुठे चोरवाटा
तळ तुझा गाठणाऱ्या ....

ध्यास तुझाच धरशी
मन माझे वेडेपिसे
तुझी चाहूल म्हणावी
कि हुरहूर नुसती ...... 

मिलिंद कुंभारे

sweetsunita66


Madhura Kulkarni

यमक फक्त जुळत नाही...पण अर्थ कळतो. छान आहे प्रयत्न!


मिलिंद कुंभारे

ssonawane, Madhura, sweetsunita,

thanks..... :)