!! तुझ्या कवितां वरच जास्त प्रेम करायला लागलोय मी !!

Started by Chetan Thakare, August 18, 2013, 10:48:04 PM

Previous topic - Next topic

Chetan Thakare

!! तुझ्या कवितां वरच जास्त प्रेम करायला लागलोय मी !!

हल्ली तुझ्या पेक्षा तुझ्या कवितां वरच जास्त प्रेम करायला लागलोय मी
तू लिहलेल्या शब्दांवर उतरवलेल्या भावनांवर, सध्या जास्तच बहरायला लागलोय मी

तुझ्या चार ओळींमध्ये तुझा स्नेह शोधायला लागलोय मी
अन् तो सापडल्यावर स्वतः चा मोह आवरायला लागलो आहे मी
   
तुझे बोल तुझ्या भावना यांच्यात बुडायला लागलोय मी
तुला मना मध्ये आठवून तुझ सावेत हल्ली उडायला लागलोय मी

तुझ्या साठी माझ्या शब्दांना कवितेत घडवायला लागलोय मी
तु दुखी होणार नाही या काळजी ने भावनांना अडवायला लागलोय मी

हल्ली तुझ्या पेक्षा तुझ्या कवितां वरच जास्त प्रेम करायला लागलोय मी
तू लिहलेल्या शब्दांवर उतरवलेल्या भावनांवर, सध्या जास्तच बहरायला लागलोय मी

                                                                                            © Çhèx Thakare

Mayur Jadhav

Chetan Thakare