मग येशील का तू माझ्या या सुंदर जीवनात ????

Started by Mayur Jadhav, August 20, 2013, 12:15:24 PM

Previous topic - Next topic

Mayur Jadhav

मग येशील का तू माझ्या या सुंदर जीवनात ???

असतेस तू माझ्या प्रत्येक ओळीच्या शब्दात ,
असतेस तू माझ्या भावोत्कट डोळ्यांत ,
असतेस तू माझ्या अश्रूंनी भरलेल्या पापण्यांत ,
मग येशील का तू माझ्या या सुंदर जीवनात ?
असतेस तू माझ्या धडधडणाऱ्या काळजात ,
असतेस तू माझ्या निर्मळ मनात ,
असतेस तू माझ्या जीवनातल्या प्रत्येक श्वासात ,
मग येशील का तू माझ्या या सुंदर जीवनात ?
असतेस तू माझ्या देवाकडे मागितलेल्या प्रत्येक मागण्यात ,
असतेस तू माझ्या गुंतलेल्या विचारात ,
असतेस तू माझ्या दिवसाही पडणाऱ्या स्वप्नात,
मग येशील का तू माझ्या या सुंदर जीवनात ?
असतेस तू माझ्या प्रत्येक हिरमूसण्यात ,
असतेस तू माझ्या खळखळून हसण्यात ,
असतेस तू माझ्यात आणि मी तुझ्यात,
मग येशील का तू माझ्या या सुंदर जीवनात ?

8888595857,
मयूर जाधव,
कुडाळ (सातारा).
 

Ankush S. Navghare, Palghar


Mayur Jadhav