घर

Started by Mrs. Sanjivani S. Bhatkar, August 20, 2013, 04:04:33 PM

Previous topic - Next topic

Mrs. Sanjivani S. Bhatkar

घर

घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
त्यात असावा प्रेमळ जिव्हाळा
नकोत नुसती  नाती

घर असावे घरासाखे
नकोत नुसत्या भिंती
भिंती वरती  असावे चित्र
नकोत नुसती घरात भांडणे विचित्र

घर असावे घरासाखे
नकोत नुसत्या भिंती
त्यात असावी नाती केसा  सारखी न तुटणारी
वेळ आली तर वाकणारी नकोत नुसती नाती

घर असावे घरासाखे
नकोत बंद दार  बंद खिडक्या
चार उभ्या  भिंती , 
उजेडात न कवडसा
एकही इथे अंधाराचीच बढती ,
नकोत नुसती नाती

घर असावे घरासाखे
घरात सुखाचा न थेंब एकही, इथे दुखाचे ढेर
घरातल्या नात्यांचा दुखाने भिजल्या भिंती 
जणू त्यांच्या डोळ्यातून अश्रू फुटती




- सौ संजीवनी संजय भाटकर