आमचे गाव - कोकण

Started by Mrs. Sanjivani S. Bhatkar, August 20, 2013, 04:52:06 PM

Previous topic - Next topic

Mrs. Sanjivani S. Bhatkar

आमचे गाव - कोकण

निसर्गाच्या कुशीत
वसले आहे कोकण
सुरुच्या वनात
सुंदर दिसती कितीतरी

रूप त्याचे देखणे
भारावून टाकी मन
डोंगर  कपारी सुंदर आहे
मन मोकळे करवंद खाणे

कधी डोंगरातून
धबधबा कोसले
तर कधी अंबराईतुनी
सूर्याची किरणे डोकाऊन जाई

रूप गोजिरे आणि देखणे
अथांग सागराचे जेवढे
बगावे तेवढे डोळ्यात साठवणे
अवगड असे

कोकणात जाता येता
निसर्ग बदलत राही
कधी डोंगर तर कधी झाडे
आणि तो विशाल समुद्र

कोकणातला अफाट समुद्र
म्हणजे एक " हिरा "
भोवताली असे नारळी बागा
कधी दिसे फणस काजू च्या  बागा

वांगी पावटा सोबत असे
हि तर मज्जा कोकणात दिसे


- सौ संजीवनी संजय भाटकर

ankushlatkar

तुमची कविता वाचून अगदी कोकणचीच आठवण झाली