अखेरचा निरोप...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 23, 2013, 05:18:26 PM

Previous topic - Next topic
अखेरचा निरोप...!!

ही शेवटची अबोल कविता माझी,
शेवटचे हे शब्द तुझ्यासाठी.....

ही अखेरीची भेट तुझी माझी,
दोर तुटली नाजुक नात्याची.....

ही शेवटचे बोल माझे,
मांडतो अधुरी भावना माझ्या मनाची.....

हे अखेरचे गीत माझे,
छेडतो तार तडकलेल्या ह्रदयाची.....

आज अखेरचा निरोप घेतोय मी तुझा,
काळजी घे तु वेडे स्वतःची..... :'( :'( :'(

_____/)___/ )______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक २२-०८-२०१३...
रात्री ११,०१...
© सुरेश सोनावणे.....