सनी लियोन [Sunny Leone] ला पत्र ... पूर्ण वाचा हे सांगायलाच नको .

Started by MK ADMIN, August 24, 2013, 04:27:55 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN


आदरणीय सनी वाहिनी,
स.न.वी.वी

पत्र लिहिण्यास कारण कि,
मागल्या वर्षी तुमी दहीहंडीला पुण्यात आला व्हता. तवाच आम्ही ठरवला होतं कि तुमाला आमच्या गावातबी बोलवायचं .

वाहिनी नाय म्हणू नका, लय अपेक्षेने तुमाला बोलावतोय. आवं अख्खा गाव तुमच्या पिरमात हाये बगा.

मागल्या आठवड्यात गरम सभा झाली तवाच तुमाला प्रमुख पाहुण्या म्हणून बोलवायचं फायनल झालंय. आवं दोनी गटांनी एकमुखानी होकार दिलाय हो. एक मेकाचा जीवावर उठलेले दोनी बी गट तुमचं नाव काढताच किती खुलले म्हणून सांगू, अहो एकमेकांच्या मांडीवरच बसायचं कमी. तुमाला बोलवायचं ठरलं तवाच पाटलांनी बायकूला माहेरी धाडलाय. तुमच्या दिमतीला रानातला अक्खा बंगला मोकळा करू घेतला पाटलांनी.



यात्रा कामितिनी तर फ्लेक्सबी छापाय टाकलेत. " सनीचा नाद करायचा नाय ", "" शितोळे -जगताप चव्हाण , सगळ्यात भारी सनी लीव्होन ", "आर आवाज कुणाचा, सनी वाहिनांचा" , सनीची वीच्छा पुरी करा " असलं लय भारी भारी छापलय बघा फ्लेक्सवर.

तुमी मानधनाच काय बी टेन्शन घेऊ नका, सरपंचानी तीन एकर बागायत विकाय काढलीया ...

चला जातु अण्णा आवाज देत्यात , पत्राची वाट पाहतोय ,

फकस्त तुमचा लाडका दीर...


शेअर करा .. तुम्हाला सनी वहिनींची शप्पत..!!

sweetsunita66

लई झक्कास बाबा !!सनीच्या नादी  लागून अस व्हाया नको
                        पाटलीन अन शेत गेलं अन दिरालाही ठेंगा  दाखो ,
    नायतर म्हणायची येळ येईल ............
तेल गेलं तूप गेलं ,हाती धुपाटण आलं