सुख उन्मादात होते जीवनाच्या वनराईत...

Started by amoul, August 25, 2013, 03:27:03 PM

Previous topic - Next topic

amoul

सुख उन्मादात होते,
जीवनाच्या वनराईत.
पिसाळणारा  वणवा,
कुठून आला त्यात.

हाताच्या शिम्पल्यातुनी,

निसटून जातो मोती.
एकट्या हातात उरते,
परकेपणाची माती.

किनारयावर मी उभा,
नेहाळत समुद्र सारा.
द्विधा मनात अजुनी,
हा सुखाचा कि दुखाचा किनारा.

लाटही सळसळणारी,
देऊन जाते चकवा.
उर्मी तगमगणारी,
पायास देते थकवा.

निखार्यात चालते पाय ,
थकनेही विसरले आता.
रोजच्याच मरणाची,
कुणा सांगावी गाथा.

आनंदाची घडी नेमकी,
माझ्या शिवाय दुमडे.
मग तो समुद्रही छोटा,
माझ्या एका अश्रू पुढे.


दिवसभर शिणतो तरी,
जाती विरून नाती.
तुझ्या देहाची शाल,
पांघरतो मग  राती.

अमोल