सावज

Started by विक्रांत, August 25, 2013, 09:20:25 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

तसे प्रत्येक स्त्रीला
हे माहित असते
ती केव्हाही कुठेही
होवू शकते सावज
कुठलाही चेहरा
कधीही होवू शकतो
पाशवी कामांध पशु 
या जगात जिथे तिथे
लावलेले असतात
शेकडो फास
शेकडो पारध्यांनी
जे तिच्या न कळत
तिचे सर्वस्व
हिरावून नेवू शकतात
पुन:पुन्हा अन पुन:पुन्हा
मैत्रीच्या नाटकात
प्रेमाच्या आशेत
लग्नाच्या आमिषात
सावज पडतच असतात
एकटेपणी आडजागी
अनोळखी पशूंनी
केलेला हल्ला 
क्लेशकारक असतोच
अस्तित्वाच्या मुळावर
आघात करणारा
पण त्या विरुद्ध निदान
न्याय तरी मागता येतो
अन त्या पशूंना
कधीकधी तरी
कोंबता तरी येते
कारागृहाच्या अंधारात
पण मैत्रीच्या सावलीत
प्रेमाच्या हिरवळीत
नात्याच्या जवळकीत
लपलेल्या सापांचे
काय करायचे
त्यांना कसे ठेचायचे
हा मोठा  प्रश्न आहे

विक्रांत प्रभाकर

aspradhan

हे सत्य आहे . पण या वर काहीच करू शकत नाही का आपण ?आपण समाजाची मानसिकता बदलायला हवी .

विक्रांत

<<<<पण या वर काहीच करू शकत नाही का आपण ?>>>>
सावित्री फुले यांच्या वेळचे स्त्रीजीवन अन आजचे स्त्री जीवन यात असलेला फरक पाहता ,झालेले बदल उत्साह दर्शक आहे .आपण(समाज) अधिकाधिक संवेदनशील होत जाणे . ती संवेदनशीलता  पसरवत जाणे .सावध होत जाणे . सक्रीय  होणे . हे घडले तरी खूप बदल होतील .या व अश्या घटना शून्य तर होणार नाहीत पण त्यांचे प्रमाण नगण्य करता येणे तरी  शक्य आहे .
धन्यवाद .