आठवण तुझ्या स्पर्शाची....

Started by Er shailesh shael, August 28, 2013, 07:18:40 PM

Previous topic - Next topic

Er shailesh shael

आकाशाच्या कुशीत चमचमणारं स्वप्न
तुझ्या पापण्यात येऊन निजलं....
पावसाचं वेडं मन
तुझ्या आठवणीत भिजलं....
तुला पाहताच शहाराही शहारला
स्पर्श तुझा असा गुलाबी
थरथरणारा त्याचा जीव
तुझ्या मिठीत काहुरला.....
फुलांना गंध तुझ्या असण्यामुळे आला
पानापानात हिरवा तुझ्यामुळे दाटून गेला
किनारा सोनेरी तुझ्या पायाशी आला
स्पर्श लाटांचा पावले सोनेरी करून गेला.....
ठसे उमटलेले वाळूवरती
जणू नक्षी नक्षत्राची
लाटाही त्या पुसेना
आठवण त्यांची ती तुझ्या स्पर्शाची....
संध्याकाळही वाटे निरागस तुला पाहून
घेऊन जातेस सावल्यांना उन जाते मागे राहून...
निघता निघता सूर्यही तुला पाहून घुटमळतो
पुसट होणारी किनार सोनेरी आकाशाची पाहून
त्याचाही जीव व्याकूळतो ....
पुन्हा नव्याने ते सर्वजण
तुझ्या येण्याची वाट पाहतात
दररोज एक नवा चेहरा घेऊन
तुझ्यासवे माझ्या कवितेत राहतात.......
-----पाउसवेडा