|| लटकंती पुराण ||

Started by केदार मेहेंदळे, August 29, 2013, 12:36:30 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

(ही रचना मी, श्री सुहास शिरवळकर याच्या "लटकंती" ह्या कादंबरीवरून केली आहे. रचना अधिक  विनोदी बनवण्यासाठी ती पोथीसारखी लिहिली आहे. रचना आणि विषयाची गंमत वाढवण्यासाठी ती पोथीच्याच टोनमधे वाचावी... )
 
वृत्त : माहित नाही.
अक्षर संख्या : ८+८+८+५ = २९
                                 || लटकंती पुराण ||

सर्व भूतास वंदुन | करितो कथा कथन | ठेवोनी शांत चित्त | श्रवण करावी ||१|| गाढ झोपेत रात्रीसं | ऐकोनी आर्त हाकेसं | घेत मागोवा निघालो | बोलावे कोण ||२|| तो काय देखील म्या | भवती अक्षरे, संख्या | पाटावर अन वाटी | उपडी एक ||३|| मी होतो वाटीत आंत | भवती लोकं बहुत | वेताळ तेथं प्ल्यांचेट | खेळत होते ||४|| विचारता प्रकार त्यांस | म्हणे खेचला माणूसं | भुतलावर जसे तुम्ही | खेचता भूतां ||५|| जरी देशील उत्तरं | विचारल्या प्रश्नांवर | सोडुन तुज देऊ | सन्मानपूर्व ||६|| मग काय सागू गत | खेळ गेला तो रंगत | प्रश्न अनेक विचारून | संपली रात्र ||७|| होता सकाळ सोडले | मजं घरासी धाडले | येता घरात दिसली | पणती एक ||८|| फोटो होता भिंतीवर | त्यास चढवला हार | जगाकडे मी त्यांतून | पहात होतो ||९|| बघुनी हे अघटीत | कळला मजं प्रकार | गाठण्या वेताळास मी | परत आलो ||१०|| तो वेताळ म्हणे बाबा | घोळ भलता जाहला | कालमापनी चुकला | ताळा अमुचा ||११|| आमच्या लोकांत काळ | सरकतो हळू फार | पृथ्वीवरी आठवडा | दिवस येथ ||१२|| रात्रभर तू राहीला | पृथ्वीचा हप्ता संपला | देह तुझा जाळीयेला | तुमची रितं ||१३|| आता न उरला देह | म्हणोनी ना इहलोक | परलोक ना कारण | मेला न तू ||१४|| तेंव्हा पासून अशीच | लटकंती नशिबात | येथे नाही तेथे नाही | लोंबतो आहे ||१५|| हे लटकंती पुराण | करतील जे श्रवण | मेल्यावरी मुक्त होती | जातील स्वर्गी ||१६|| जो करेल थट्टा याची | त्यास मिळो लटकंती | येथे नाही तेथे नाही | दुर्गती ऐसी ||१७|| शेवटी करून स्मरण | वेताळ राजास जाणं | हे लटकंती पुराण | पुर्ण करीतो ||१८||

                 || इती वेताळायन महा || लटकंती पुराण साम्पुर्णम ||
केदार................