सूट

Started by sudhanwa, August 30, 2013, 11:39:35 AM

Previous topic - Next topic

sudhanwa

सूट हा शब्द इतका सूटसूटीत असेल असं वाटलं नव्हतं....

भाजीपाल्यावर सूट
सूटकेस वर सूट
सूटावर बूट अन्
बूटावर सूट

अॅडमिशन घेताना, जातींवर सूट
पेपर लिहताना, ५ पैकी ४ प्रश्न साेडविण्याची सूट
काठावर नापास होताना,
ग्रेस मार्किंगची सूट

३० दिवसांत, ४ शनिवारांची सूट
बेंचवर बसून, पगार घेण्याची सूट
नोकरी असूनही, फ्रीलान्स करण्याची सूट

भक्तिभावाला नवसांची सूट
दिमाखदारांना दर्शनरांगेची सूट

हॅप्पी आवर्समधे, दारूवर सूट
पबमध्ये, 'कपल'वर सूट

विचारांची सूट
बडबडण्याची सूट
राग आला कुणाला त्याचा
तर पळत सूट

करात सूट
कर्जात सूट
तारणात सूट

अम्ब्युलन्सला; सिग्नलची सूट
लाल बत्तीला; टोलवर सूट

सरकारी कचेरीत; भ्रष्टाचारावर सूट
कोर्ट कचेरीत; जामिनावर सूट

कळलयं कुणाला का या सूटीमागचं कूट?
कळलयं कुणाला का या सूटीमागचं कूट?

sweetsunita66

मस्त आहे

sudhanwa


दमयंती

सूटीमागचं कूट
जमलं मैत्रिणींचं चार अगदी मेतकूट
काव्यशास्त्रविनोदाची झाली लयलूट
आता सांगा आहे का हे सगळे जग झूट?

sudhanwa

 :)
Thank you damayanti..a very spontaneous stanza from your side

sweetsandy9

फ़ार सूट्सूटीत कविता आहे  ;D

सुट्सुटित कवितेमधे उधळलीस
अनेक विचाराची लूट,
मग आता दाद देताना
कशाला हवी कसली सूट.. :D

sudhanwa

Thank you sweet sandy...
thanks for the poetic reply :) :)

anildgawali

तर पळत सूट ! झकास ! लयी भारी !!