तू फक्त बोलत राहा ...............

Started by प्रशांत दादाराव शिंदे, September 03, 2013, 10:42:44 AM

Previous topic - Next topic
तू  फक्त  बोलत राहा
मी  साद देतो
शब्दांना तुझ्या  प्रेमाचे संगीत  देतो ..........

शब्द  मला  सुचत नाही
गझल काय मी करावी
पण तू भेटतेस अन
तुझ्या हातातल्या पुष्पांना माझ्या हृदयाशी घेतो
अन  चार  ओळी मी मग  बोलतो
तुझ्यासमोर गायले तेच 
माझे  सर्वोत्तम गीत मी समजतो ..........

दिवस  हे  एकट्यात  जातात
आपली भेट  होत नाही
मी  डोळे  बंद  करून श्वास घेतो
अन  तुझा  हृदयातून आवाज  येतो ...........

तू  फक्त आठवत राहा
मी नेहमीच  सोबत असतो
तुझ्या हृदयात राहताना 
तुझ्या  डोळ्यांत  पाहताना
मी नेहमीच  तुझ्या  प्रेमात पडत असतो ............

शोना तू  फक्त  बोलत  राहा
मी  तुझा  दिवाना बनून  आयुष्यभर  ऐकत   राहील
तुझ्या ओठांना पाहत राहील
तुझ्या  चेहऱ्यावर  हस्यांना  माझ्याही मनाला आनंदी ठेवील

तू फक्त  बोलत राहा ...............
-
लेखन  : ©प्रशांत डी शिंदे


arpita deshpande

तू  फक्त  बोलत राहा
मी  साद देतो
शब्दांना तुझ्या  प्रेमाचे संगीत  देतो ......Chan kavita

लीला


तीन वर्षांनंतर .........


शोने, केव्हा थांबवशील तू
अखंड बोलण्याची टकळी?
प्रतिसप्ताही एके दिनी
असत गांधीजी पाळत मौनव्रत
नि काढत सूत वापरून टकळी.

होते मी म्हटले वर्षांपूर्वी तीन -
"मी तुझा दिवाना बनून आयुष्यभर ऐकत राहीन"
होतो मी तेव्हा दिवाना-पागल खास
होता स्वप्नसृष्टीत माझा रहिवास.

sweetsunita66



तू  फक्त  बोलत राहा
मी  साद देतो
शब्दांना तुझ्या  प्रेमाचे संगीत  देतो ......Chan kavita
dhanyvad arpita :)



तीन वर्षांनंतर .........


शोने, केव्हा थांबवशील तू
अखंड बोलण्याची टकळी?
प्रतिसप्ताही एके दिनी
असत गांधीजी पाळत मौनव्रत
नि काढत सूत वापरून टकळी.

होते मी म्हटले वर्षांपूर्वी तीन -
"मी तुझा दिवाना बनून आयुष्यभर ऐकत राहीन"
होतो मी तेव्हा दिवाना-पागल खास
होता स्वप्नसृष्टीत माझा रहिवास.
khup chan  leelaji :)