पहिली भेट आमची...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., September 03, 2013, 03:03:53 PM

Previous topic - Next topic
पहिली भेट आमची...!!

आज पहिल्यांदा तिची नि माझी,
विसरु न शकणारी विलक्षण भेट झाली,
मला पाहताच गोड गोड लाजली ती,
आनंदाने खळखळून हसू लागली.....

किती रे छान आहेस रे तु शोन्या,
मला असे प्रेमाने बोलू लागली,
खुप त्रास दिला रे मी तुला,
मला माझी प्रेमळ चुक कळली.....

काय जादू केलीस रे माझ्यावर,
खुप प्रेम करतेय रे तुझ्यावर,
मी तुला पाहताच मला विसरले,
कळलेच नाही कधी मी तुझी झाली.....

बरेच काही बोलायचे होते तुझ्याशी,
पण शब्दच आले नाही ओठांनवर,
मी स्वप्नात तर नसेल ना,
याची मला भिती वाटू लागली.....

पण ???

आज तु भेटलास तर,
फक्त तुलाच पाहत राहावं असं वाटत होतं,
मनात होतं रे खुप काही,
जे तुझ्यासमोर व्यक्त करु नाही शकली....

किती रे जाणतोस असे मला,
की अनोळखी असुन मला आपलं केलस,
मन तर कधीचच झालं होतं तुझं,
ह्रदय ही तु काढून घेतलस.....

दुराव्याची वेळ आली जेव्हा,
तेव्हा तुलाच डोळे भरुन पाहत होते,
मी निघाले पुन्हा घरी जेव्हा,
तेव्हा मी तु नजरेआड होताच मी रडू लागली.....

_____/)___/ )______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक ०३-०९-२०१३...
दुपारी ०२,२९...
© सुरेश सोनावणे.....


मीना

किती रे "छान" आहेस रे तु "शोन्या",
.
.
.
.
.
.
तुझ्या सगळ्या कविताही असतात
तुझ्झ्यासारख्याच, शोन्न्या, रे,
कित्ती कित्ती कित्ती छ्छान;
एक्कच उणीव असते, शोन्या,
कवितांमधे तुझ्या, ती अशी -
निदान माफक प्रमाणात शुद्ध
मराठी नसते कवितांमधे तुझ्या.
"तेव्हा मी तु नजरेआड होताच मी रडू लागली" -
तू नजरेआड होताच रडू मला
येण्याचे कारण होते, शोन्या,
त्या ओळीतले अशुद्ध मराठी तुझे.
एरवी कित्ती छान आहेस
माझ्या लाडक्या शोन्या रे, तू.