एक कवितावेडी मुलगी...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., September 03, 2013, 05:24:01 PM

Previous topic - Next topic
एक कवितावेडी मुलगी...!!

काल सहज एका मुलीने मला विचारलं की,
" अहो तुम्ही ना,
खुप छान कविता करता,
म्हणजेच लिहता.....
तुमची कविता वाचून,
मनाला खरचं खुप समाधान मिळत.....
तर तुम्ही मलाही,
कविता करायला म्हणजे लिहायला शिकवणार का ???
तर तिला मी कवितेत दिलेलं हे उत्तर.....

तुला कविता करणे,
किंवा लिहणे शिकवण्यापेक्षा.....

तुलाच कविता बनवतो,
आणि शब्दात रचतो मी.....

तुझ्या दिसण्यावर,
तुझ्या हसण्यावर.....

तुझ्या लाजण्यावर,
तुझ्या रागवण्यावर.....

तुझ्या रुसण्यावर,
तुझ्या रडण्यावर.....

भावनांना तुझ्या,
माझ्यात उतरवतो मी.....

शेवटी माझे हे उत्तर ऐकताच,
तिच्या तोँडून एकही शब्द फुटला नाही.....
कदाचित तिला कळल असेल की,
कविता करायला शिकायची नाही तर
मनात तशा भावना असण्याची गरज असते.....

_____/)___/ )______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक ०३-०९-२०१३...
दुपारी ०४,४९...
© सुरेश सोनावणे.....

मीना


काल सहज एका मुलीने मला विचारलं की,
" अहो तुम्ही ना,
खुप छान कविता करता,
म्हणजेच लिहता.....
तुमची कविता वाचून,
मनाला खरचं खुप समाधान मिळत.....
तर तुम्ही मलाही,
कविता करायला म्हणजे लिहायला शिकवणार का"
.
.
.
.

मी दुसरी एक मुलगी म्हणते,
"अहो, तुम्ही ना
आहात कित्ती कित्ती चल्लाख, बाई;
कोणा "एका मुलीने" "सहज" काय
विचारलं तुम्हाला देऊन त्याचा
'उतारा' केलीत की हो तुम्ही
प्रमाणात भरपूर आत्मस्तुती.
तुमची पाहून ही चल्लाखी
गडे टाकलाय्‌ मी तुमच्यावर
माझा अगदी ओवाळून जीव!"



walekarajay

एक बाकि, एकाक
एक अंत, एकांत
एक अडके, एकात.
एक एकटा, जगात.
एक खिडकि.
एक वारा.
एक चंद्र.
एक तारा.
एक नजर.
एक वाट.
एक एकटा, एकटाच्..

-अजय वाळेकर :)