आपल्या प्रेमाची कहाणी...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., September 05, 2013, 09:45:47 AM

Previous topic - Next topic
आपल्या प्रेमाची कहाणी,
नकळतच अशी घडली आहे.....

झाली सुखाची बरसात,
दुःखाची आग विझली आहे.....

तु आयुष्यात आलीस,
ह्रदयाची बाग फुलली आहे.....

तु माझी झालीस,
अन्........
आयुष्याची गाडी सुसाट चालली आहे.....

तुला मिळवून धन्य झालो मी,
देवाने आपली कृपा दृष्टी माझ्यावर बरसवली आहे.....

© सुरेश सोनावणे.....