येथे नाही तेथे नाही

Started by केदार मेहेंदळे, September 06, 2013, 03:04:39 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 वृत्त : मात्रावृत्त(१६+१६)


पांढरपेशा सामान्य मी, कधी कुणास नाडले नाही
वाकवाकून जगताना मी, हाड मणक्यात टिकले नाही

नाका समोर चालत गेलो, कधीच कसले लफडे नाही
घरीच बसून लपून प्यालो, खर्चले मी रोकडे नाही

बुडवी नपैसे मी कुणाचे, इतकेही मन कोते नाही
दान मागण्या शोधा दुसरा, घरात माझ्या पोते नाही

मिळाले ते स्वीकारले मी, गायलेच रडगाणे नाही
पाहिजेल जे मिळवीन सर्व, ते चलनी मी नाणे नाही 

व्यापार्यांना जाब विचारू, इतके आम्ही खंदेनाही
डोळ्यांतील पाणीचअटले, सोलावयास कांदे नाही

मतदान मी कधीच न केले, तरी तयांचे अडले नाही
डावे, उजवे मिळून चाले, सरकार तरी पडले नाही

मोर्चे, दंगल कधीच नाही, दंगे, क्रांती, झगडे नाही
मध्यममार्ग नेहमी माझा, येथे नाही तेथे नाही   

अपक्ष, तठ्स्त काहीच नाही, अनुमोदन वा विरोध नाही
ठामभूमिकाएकचीमाझी, येथेनाहीतेथेनाही 

जगतानाही मरतच गेलो, भरीव काही केले नाही
चितेवरी मी निजलो जेंव्हा, जगी कुणाचे अडले नाही   

केदार....

गंगाधर

श्री. मेहेंदळे,

स. न.

तुमच्या वरच्या कवितेतले १६ +१६ मात्रांचे वृत्त कोणते आहे? त्या वृत्ताचे मात्रानियम काय आहेत?

मात्रांच्या बेरजेपलिकडे कुठल्याही वृत्ताचे मात्रानियम काटेकोरपणे पाळणे बरेच कठीण असते. ते पाळले नसता कवितेच्या गेयतेत कमतरता निर्माण होते.

मोरोपंतांसारख्या कवींचे भाषाप्रभुत्व अविश्वसनीयपणे अचाट होते!