हळू हळू त्याचा प्याला

Started by विक्रांत, September 08, 2013, 01:18:30 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

हळू हळू त्याचा प्याला
रिता रिता होत होता
हसणारा मित्र माझा
उदासीत बुडत होता
सदा कदा धडपडणारा
जीवन रसिक कष्ट्णारा
दु:खाने आतल्या आत
हळू हळू खचत होता
संसाराच्या नावेमध्ये
खूप पाणी भरले होते
उसळत्या प्रवाहात तो
तरी धाव घेत होता
हळू हळू एक एक
व्यथा उलगडत होता
मी फक्त समोर होतो
स्वत:शीच बोलत होता
भरलेला गळा अन
जडावला स्वर होता
दुसरा पेग खरतर
केवळ बहाणा होता
दु:खाचे कारण साऱ्या
नाती अपेक्षा असते
हेच मला समजावून
पुन:पुन्हा सांगत होता
प्याल्यासवे तोही हळू 
रिता रिता होत होता
न पिणारा माझ्यातला
प्याला मागत होता

विक्रांत प्रभाकर             

Maddy_487


shivaaji sangle

रित्या पेल्यास विचार....?

नसण्याने सोबत तुझी,
किती एकाकी
मला वाटले होते ?

नीज येण्या अगोदर,
डोळ्यात कोणते
स्वप्न दाटले होते?

उरातून कळ निघतांना,
ऋदयातून रक्त
कीती सांडले होते ?

रित्या पेल्यास  विचार,
पितांना मदिरेसह
अश्रु  किती होते ?


(c) शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com 09422779941



दर्पण दिपक गोनबरे

#5
विचार मांडण्याचा खूप छान प्रयत्न... आणि सुंदर प्रतिसाद शिवाजी सांगळे.