दोन शरीर एक जीव आहोत आपण.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., September 08, 2013, 04:53:56 PM

Previous topic - Next topic
मनातले भाव जाणलेस तु माझ्या,
दिलेस सुखाचे अनमोल क्षण.....

हा प्राणही तुझाच आहे गं वेडे,
तुझ्याशिवाय मला आहे तरी कोण.....

माझ्या प्रत्येक कवितेत नकळत येतेस तु,
वेड लावतेस जिवाला बेचैन करतेस मन.....

अशी नको ना रागवत जावूस माझ्यावर,
तुच नाही समजणार तर मला समजेल कोण.....

नको ना रुसुस नको ना रडूस असे,
तुझ्या अशा वागण्याने दुःखते गं मन.....

मी तुझा तु माझी कोणी नसलो तरी,
दोन शरीर एक जीव आहोत आपण.....

दोन शरीर एक जीव आहोत आपण.....

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक ०८-०९-२०१३...
दुपारी ०४,४२...
© सुरेश सोनावणे.....

arpita deshpande

मी तुझा तु माझी कोणी नसलो तरी,
दोन शरीर एक जीव आहोत आपण.....nyc 1

Çhèx Thakare