तुझा एक कटाक्ष

Started by SANJAY M NIKUMBH, September 09, 2013, 07:50:18 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तुझा एक कटाक्ष
===========
विश्वास सार्थ ठरवतेस
तू निरोप घेतांना
एक कटाक्ष टाकतेस
नजरेआड होतांना

तो एक कटाक्ष
तुझं मन सांगून जातो
विरहात भिजलेलं तुझं
मन दावून जातो

तो नजरेचा गंध
मी काळजात ठेवतो
हसत हसत तुझा
निरोप मी घेतो

पण नजरेआड झाल्यावर
तो क्षण डोळ्यासमोर तरळतो
तुझं उत्कट प्रेम कळल्यानं
मी बेधुंद आयुष्य जगतो

तेव्हा कळते एक कटाक्ष
किती गरजेचा असतो
तुझ्या माझ्या नात्याला
तोच तर जिवंत ठेवतो .
==================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ९ . ९ . १३  वेळ : ७ . १५ स.   
https://www.facebook.com/SanjayNikumbhPoems?ref=hl


विक्रम

तुझं उत्कट प्रेम कळल्यानं
मी बेधुंद आयुष्य जगतो

आणखी थोड्या दिवसांनी होईल
तुझेमाझे सावधान शुभमंगल
सत्यसृष्टी अवतरेल त्यानंतर
कुठली मग धुंदी; चाकोरी निरंतर