खरं तर तिला विसरताच येत नाही.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., September 09, 2013, 02:04:45 PM

Previous topic - Next topic
अडखळणा-या पावलांना,
कोणच का सावरत नाही.....

तुटलेल्या ह्रदयाला,
कोणच का जोडत नाही.....

मोडलेल्या मनाला,
कोणच का आधार देत नाही.....

हल्ली मी या जगात नसण्याचा,
कुणाला काहीच फरक पडत नाही.....

मनाने जोडलेल्या नाते तोडताना,
कुणाला काहीच का वाटत नाही.....

असे कसे हे दगडी मनाचे लोक,
दुस-यांच्या भावनांनशी खेळून मन भरत नाही.....

प्रयत्न तर खुप करतोय विसरण्याचा पण,
खरं तर तिला विसरताच येत नाही.....

खरं तर तिला विसरताच येत नाही.....

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक ०९-०९-२०१३...
दुपारी ०१,४९...
© सुरेश सोनावणे.....

विकास


"असे कसे हे दगडी मनाचे लोक?"
मेणाहुन मऊ माझे "हार्ट" झाले असे, हो, "ब्रोक्‌"
आता उपाय म्ह्णुनी आवरण्या माझा शोक
स्मरत बसतो मी रामदासकृत मनाचे श्लोक.


मना मानसीं दु:ख आणूं नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ।
विवेकें देहेबुद्धि सोडूनि द्यावी ।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ।
- श्लोक १२

Manoj Parkhi