मी हे जग सोडून गेल्यावर...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., September 10, 2013, 03:52:36 PM

Previous topic - Next topic
मी हे जग सोडून गेल्यावर,
कुणालाच काही फरक पडणार नाही.....

मी हे जग सोडून गेल्यावर,
माझ्यासाठी कोणीच रडणार नाही.....

मी हे जग सोडून गेल्यावर,
माझं आपलं कोणीच राहणार नाही.....

मी हे जग सोडून गेल्यावर,
माझ्या आठवणी कधीच मिटणार नाही.....

मी हे जग सोडून गेल्यावर,
माझे आपले होतील परखे अनोळखी माझे होणार नाही.....

मी हे जग सोडून गेल्यावर,
कुणालाच माझा त्रास जाणवणार नाही.....

मी हे जग सोडून गेल्यावर,
कविता माझ्या कोणीच वाचणार नाही.....

आनंदाने येतील सगळे मयतीला माझ्या,
खरे अश्रूं दुःखाचे कोणीच गाळणार नाही.....

दोन दिवस रडतील खोटं खोटं माझ्यासाठी पण,
मायेने माझ्या देहाला कोणीच कवटाळणार नाही.....

मी हे जग सोडून गेल्यावर,
पुन्हा कुणालाच मी सापडणार नाही.....

मी हे जग सोडून गेल्यावर,
कधीच कुणाला एक क्षणही आठवणार नाही..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक १०-०९-२०१३...
दुपारी ०३,३१...
© सुरेश सोनावणे.....


मीना

मी हे जग सोडून गेल्यावर,
कविता माझ्या कोणीच वाचणार नाही.....

८८८८८८८८८८८८८८८८८८८८८८८८८८८८८


वाचतील वाचक मग ह्या
"मराठी कविता" ब्लॉगचे
जग हे सोडून गेलेल्या (भविष्यकाळी)
कवीच्या एका शोककविता विपुल
.
.
.
वाचण्याच्या मनस्तापातुनी.
(सांगा, सांगणार काय दुसरे मी?)

 

   

Nandkishor Pathak