भाव नयनातले...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., September 11, 2013, 10:56:04 AM

Previous topic - Next topic
भाव नयनातले...!!

अबोल नयन हे,
खुप काही बोलतात.....

मनातले भाव ते,
अलगद उलगडतात.....

तु समोर येताच,
लाजेने चूर चूर होतात.....

तु दिसला नाहीस की,
तुलाच ते शोधतात....

खुप जीव जडलाय तुझ्यावर,
हे अश्रूंवाटे व्यक्त करतात.....

कधी हसतात कधी रडतात,
क्षणा क्षणाला तुलाच ते आठवतात.....

_____/)___/ )______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक ११-०९-२०१३...
सकाळी १०,४३...
© सुरेश सोनावणे.....

Shruti Ovale

अबोल नयन हे,
खुप काही बोलतात.....
:)