तुझं आवडणं

Started by SANJAY M NIKUMBH, September 11, 2013, 09:20:08 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तुझं आवडणं
===============
माझ्या मनातले ठोकताळे
तू उधळून लावतोस
मी विचार करते काही
तू मात्र वेगळाच वागतोस

तुझं हे असं वागणच
मला तुझ्याकडे खेचत जातं
कितीही ठरवलं दूर जायचं
तुझ्याजवळ घेऊन येतं

कुणी जसं वागूच शकत नाही
तसा तू वागतोस
अन तुझ्या असं वागण्यानचं
माझ्या काळजात घर करतोस

कित्तींदा येतं मनात
माझं मन खंर ठरावं
पण तुला चांगलं कळतं
माझं मन कसं जिंकाव

तू काहीच डावपेच न खेळता
साध्या मनानं वागतं असतोस
म्हणून तर माझ्या हृदयाला
तू मनापासून आवडतोस .
=====================
संजय एम निकुंभ , वसई
दि.९ .९ . १३ वेळ : ९ . ०० स.