राधिका

Started by Saee, September 13, 2013, 11:00:15 AM

Previous topic - Next topic

Saee


बासरीचे सूर छेडून
वेड लावे तो जीवा,
अंतरीच्या भावनांना
स्पर्शुनी म्हणे राधिका


का रे कान्हा साद द्याया
वेळ इतुका लाविला
वाटुली पाहता तुझी रे
बेजार झाली राधिका


तव सखीच्या आसवांनी
चिम्ब भिजली हि धरा
अथांग सागर तिच्या डोळी अन
गालात हसतो सावळा


पाहिलास तू छेड छेडून
अंत तिच्या रे प्रीतीचा
पहा निघाली दूर देशी
ती तुझी रे राधिका


लावण्य सजले नखशीकांत
अन माथी पडल्या अक्षता
बिलगुनी मायेस रडते
माहेरवाशीण राधिका


जा सखे जा, नांद सुखाने
म्हणती सार्या गोपिका
आणि नयनात भरू पाहते
सावळ्याला राधिका