रूपगर्विता

Started by aap, September 13, 2013, 12:31:34 PM

Previous topic - Next topic

aap

रूपगर्विता

रुप  पाहते मी दर्पणी
लाखात मी अशी देखणी

कांती जरी गहूवर्णी
नासिकेत विलसे खडा हिरकणी

मोहक काया सिंहकटी
तीळ काळा शोभे हनुवटी

कुंतल काळे विपुल सुकेशिनी
पाठीवरी रुळे नागिणीची फणी

ओष्ठ शलाका नाजूक जिवणी
करुनी साजशृंगार वेणी फणी

जो तो पाहे मागे वळूनी
पुसे एकमेका कोण ही रमणी

तोर्यात चालली ती झणी
रूपगर्विता सजणाची साजणी
                     सौ .अनिता  फणसळकर