देवा श्रीगणेशा

Started by SANJAY M NIKUMBH, September 14, 2013, 11:38:32 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

देवा श्रीगणेशा
===============
अनंत रूपे तुझी
अनंत नावे
कुठल्याही रूपांत
तू मनास भावे

कुठलाही आकार
द्यावा चेहऱ्यास
तुझ्या दर्शनाने
मनास मोह्वावे

गजमुखी तू
विद्येचा पती
तूच आहेस
निराकार गणपती

तुझ्या नावानेही
जगणे समृद्ध व्हावे
पाहता लोटांगण वाटे
पायाशी घालावे .
----------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि. १३ . ९ . १३ वेळ : १० . ४० रा.