एक मात्र नक्की

Started by SANJAY M NIKUMBH, September 14, 2013, 11:43:40 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

एक मात्र नक्की ......................... संजय निकुंभ
============
एक मात्र नक्की
मी तुझ्याआधी मरणार आहे
या जगात नसतांनाही
तुझ्या रूपांत उरणार आहे

इतका गंध प्रेमाचा
तुझ्या श्वासात भरणार आहे
कि मेल्यावरही तुझ्या डोळ्यात
आनंदाश्रू तरळणार आहे

तुझ्या हृदयाच्या कप्प्यांना
आठवणीनी भरणार आहे
माझे अस्तित्व संपूनही
तुझ्या डोळ्यांत मी असणारं आहे

मी बघतं राहीन तुला
माझ्यात डुंबलेली असतांना
तुझ्यावरच्या कवितांना गोंजारत असतांना
आपल्या जगण्यातला क्षण अन क्षण
त्या शब्दांत तुला गवसणार आहे
हे बघून मी हि आनंदी होणार आहे .
----------------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि. १२ . ९ . १३ वेळ : ७ . ०० स.

Çhèx Thakare