मैञी तुझी अन् माझी

Started by kavita.sudar15, September 18, 2013, 10:02:51 AM

Previous topic - Next topic

kavita.sudar15

दोन मने, एकत्र हसतात एकत्र बोलतात,
  पण प्रेमाचे गुपित कधीच एकमेकांना ना सांगता राहतात....!
हि दोन मने एक मैत्रीण अन एका मित्राचे आहे, जिथे कधी मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले दोघानाही न कळले आहे....!
दोघही एकमेकांवर खूप प्रेम करतात,
  पण परिस्थिती मुळे सांगण्यास घाबरतात....!
मित्राचे लग्न ठरलेले आहे,
  मैत्रिणीने प्रेम हे म्हणून मनी लपवलेले आहे....!
तो तिला म्हणतो का ग वेडे मला आधी नाही भेटलीस,
  मग आपणच असतो एकमेकांचे आता सोबती....!
ती म्हणे त्याला देवाच्या मनी काय आहे कधी कुणास कळले म्हणूनच प्रेम असूनही आपले नाते नाही जुळले....!
कदाचित पुढच्या जन्मी आपण भेटू,
  तू अन मी असे आपले जग सजवू....!
या जन्मी मैत्री आपली जपावी मिळून दोघांनी,
  पुढील जन्मी आपण होऊ तू साजन अन मी साजणी....!!!!! @ कviता @

sweetsunita66





Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]