विरहाची वाट ..................

Started by प्रशांत दादाराव शिंदे, September 19, 2013, 11:05:46 AM

Previous topic - Next topic
विरहाच्या वाटेवर  चालताना
पुन्हा पुन्हा मागे पाहिले
तू नव्हतीस पण

तू  जिथून गेलीस तिथेच 
माझे मन हे बसून  राहिले ..........

एकट्याने  चालायचे होते हि वाट
आयुष्यभर तुझ्या  विरहाच्या अग्नीत 

मला  असेच   जळायचे होते
असेच का  जगायचे मी
का नाही मरण पत्करायचे  मी
निशब्द ह्या भावनांना आता
कसे  समजवायचे मी  .........

असेच आता जगायचे आहे
पण  एकटे  जगता
ही येत नाही
आईला ही  पाहवत नाही

डोळ्यांत लपवलेले अश्रू
म्हणते सारखे " बाळा  तू  विसरून का जात नाहीस  " ..........

आईच्या कुशीत  डोके ठेवतो

मग मायेचा  हात फिरतो
अन  आठवणींचे ओझे  हलके करून

मी पुन्हा नव्याने सुरुवात करतो
वाटेत येणारी  प्रत्येकात कधी  तुलाच मी पाहतो

अन खरेच अश्या  स्तब्ध अंधारात 
माझे अस्तित्व मी शोधतो............
-
©प्रशांत डी शिंदे