पावसाची जादू

Started by SANJAY M NIKUMBH, September 19, 2013, 10:29:02 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

पावसाची जादू  .................. संजय निकुंभ
==========
अशी कायं बंर जादू
आहे या पावसांत
तो येताच हरवतो
मी प्रियेच्या प्रेमात   

तिचाच चेहरा दिसतो
प्रत्येक थेंबा थेंबात
तिचाच गंध भरतो
माझ्या श्वासाश्वासात

त्याची चाहूल लागताच
तिची आठवण उमलते मनात
तो निघून गेल्यावरही
तीच असते हृदयात

अशी कायं बंर जादू
आहे या पावसांत
तो येताच पुन्हा पुन्हा
पडतो प्रियेच्या प्रेमात .
==============
दि. १९ . ९ . १३  वेळ : ९ . ५०  स. 
 

Kiran Patil