मला जाउद्याना घरी

Started by केदार मेहेंदळे, September 20, 2013, 04:54:35 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत कोणती गाणी लावावी ह्याचा काही धरबंध उरला नाहीये. पण काल तर आमच्या गल्लीतल्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत कमालच झाली. भसाड्या आवाजात पुरुष गायक "मला जाउद्याना घरी आता वाजलेकी बारा" हि लावणी रेकत होता. सगळेजण अचकट विचकत नाचत होते. आणि गणपती बिचारा ट्रकवर उदास बसल्यासारखा दिसत होता. मलातर असा भास झाला जणू तो गणपतीच विनवण्या करतोय...........
"मला जाउद्याना घरी
माझे वाजलेकी बारा"......

या प्रसंगावरून मला सुचलेलि ही "मला जाउद्याना घरी आता वाजलेकी बारा" या लावणीवर रचलेली हि विडंबनात्मक लावणी . कल्पना अशी आहे की गणपती वैतागून हे म्हणतो आहे.
             
                मला जाउद्याना घरी

आली निघायाची रात जिव पडला भांड्यात
ढमढम ढोलक्याची मला सोसना
कधी काय कुठं व्हलं जिव येईल गोत्यात
त्याचा न्हाई भरवसा धीर निघना

राखली मी, मर्जी तुमच्या, मंडळात मी आलो
गाण्याच्या या, आवाजांनी, पूर्ण बहिरा मी झालो
बाबा सोड आता तरी, नाही ताबियेत बरी
पुन्हा भेटू आता वर्षी म्होरल्या     
मला जाउद्याना घरी, माझे वाजलेकी बारा  – ४

(कोरस)
हं...कशापाइ छळता मागं माझ्या लागता
असं काय करता मला सोडाना आता पाण्याशी
हं...दिडाचे बी गेले सारे, पाचाचेबी गेले
आता धाव्याचे चालले माघारी 
मला जाउद्याना घरी, माझे वाजलेकी बारा  – २


विद्येचीही, भरून झोळी, मी उभा देण्या मांडवात
धनधान्य, मागण्यास, बघा आले समदे मांडवात 
अंगावर, सोनं माझ्या, झाला विमा माझा लाखात
दर्शनाचे, इकले पासं, बघा त्यांनी लाखालाखात

भाई हो बाई गं का घेतले तुम्ही लाखात ? (कोरस)

रे...मंत्री आला, पुजण्याला, संत्री झालेकी गोळा
हार घाली, कुठून कोणी, भाव दावून खोटा
आता कसा शांत राहू, ठेवू माझ्यावर काबू
बाबा राग माझा मला साव्हेना || १ ||
मला जाउद्याना घरी, माझे वाजलेकी बारा 

(कोरस)
हं...कशापाइ छळता मागं माझ्या लागता
असं काय करता मला सोडाना आता पाण्याशी
हं...दिडाचे बी गेले सारे, पाचाचेबी गेले
आता धाव्याचे चालले माघारी 
मला जाउद्याना घरी, माझे वाजलेकी बारा
मला जाउद्याना घरी, माझे वाजलेकी बारा
बारा ....| बारा .... बारा .... जी जी रं जी

हं...सरला दिसं, झाली रात, आले ढोल ताशा घेऊन
घाण गाणी, कान फोडी, जणू बॉम्ब फुटे डोक्यात
नाचताना, न्हाई भान, जणू नाचतसे वेताळ
ट्रकामंदी, एकटा मी, नाही कुणीच भानावर

भाई हो बाई गं नाही कुणीच भानावर (कोरस)

रे...पार रया गेली माझी आलो तुम्हा भेटाया
औन्द्याच्याहो वाक्ताला मी झालो वर्षाला मोकळा
जिवा घाबरला जरी कळ काढतो मी थोडी
आता तरी जरा घाई कराना         
मला जाउद्याना घरी, माझे वाजलेकी बारा 3
आहो जाउद्याना घरी,...........

(कोरस) 
हं...कशापाइ छळता मागं माझ्या लागता
असं काय करता मला सोडाना आता पाण्याशी
हं...दिडाचे बी गेले सारे, पाचाचेबी गेले
आता धाव्याचे चालले माघारी 
मला जाउद्याना घरी, माझे वाजलेकी बारा 
मला जाउद्याना घरी, माझे वाजलेकी बारा
बारा ..... बारा ..... बारा ..... जी जी रं जी

केदार..... 

वृत्त बरोबर आहे का मला माहित नाही पण मी लिहिन्या आधी ती लावणी चार पाच वेळा ऐकली आणि मग हे शब्द लिहिले. त्यामुळे लिहून झाल्यावर मला तरी ती त्या लावणीच्या ठेक्यात म्हणता आली. 

santoshi.world


केदार मेहेंदळे


AD

Apratim...... apanas vinanti ki he gane record room madhye record karun ghya....kinva Fu Bai Fu madhye skit mhanun pathva.... nakkhi blast milel.....   Fu Bai Fu che skit writer shri milind shintre 9822118278 yana sampark kara....dhamal yeil ya ganyane.....

AD

Apratim...... Fu Bai Fu chya skit sathi pathaun dya..... dhamal karel he gane.... Milind Shintre ( Skit Writer ) 9822118278 yana samparka kaara.... Cheese hoil yache.