|| मी न माझा राहतो ||

Started by Çhèx Thakare, September 22, 2013, 05:12:48 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

||  मी न माझा राहतो   ||
.
.
.

असतेस समोर तू जेव्हा
मी न माझा राहतो
नभी सूर्य असल्या परी
स्वप्नात तूला मी पाहतो
.
तू सोबत असते माझ्या जेव्हा
मी न माझा राहतो
नितळ पाण्याच्या झरया प्रमाणे
तूझ्या मधे मी वाहतो
.
लाजतेस नकळत मला पाहून जेव्हा
मी न माझा राहतो
तूझ्या हर्श चेहरया वरची मी
खळी बनू मी पाहतो
.
असतेस स्वप्नात तू जेव्हा
मी न माझा राहतो
सूखद आनंदाच्या प्रवासास
सोबती तूला पाहतो
.
.
©  Çhex Thakare

Maddy_487

Kya baat hai yaar khup sundar..

तू सोबत असते माझ्या जेव्हा
मी न माझा राहतो
नितळ पाण्याच्या झरया प्रमाणे
तूझ्या मधे मी वाहतो

Çhèx Thakare



Çhèx Thakare