कलियुग.

Started by pralhad.dudhal, September 24, 2013, 02:59:33 PM

Previous topic - Next topic

pralhad.dudhal

कलियुग.
भेटतात कोठे माणसे दिलदार हल्ली?
पाठीमागुनच आता होतात वार हल्ली!
गावच्या विचारांचा आरसा न उरे आता,
छेडाछेडीचा अड्डा चावडी पार हल्ली!
    शेजार कोणाचा आहे माहिती ना आताशा, 
मयतास मिळेनात खांदेही चार हल्ली!
आता कुठे मिळेना संस्कारांची ती शिदोरी,
बोकाळला चहूकडे आतंक फार हल्ली!
कलियुगात आता माणूस पशु झाला,

होते अबलांची भरदिवसा शिकार हल्ली!
कोण म्हणते येथे नांदते ती लोकशाही?
बंदुकीच्या गोळीने मरतो विचार हल्ली!
           .....प्रल्हाद दुधाळ.