अदा तुझ्या प्रेमाची

Started by SANJAY M NIKUMBH, September 25, 2013, 08:10:31 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

अदा तुझ्या प्रेमाची
===============
तुला भेटायला आल्यावर
तुला काम धंदा नाही वाटतं
सहज तू बोलून जाते

मी आल्याचा आनंद
चार चौघानसमोर
तू असा प्रकट करते

तुझं हे शहाणपण
माझ्या मनापर्यंत
बरोबर पोहचतं

वेड्यासारख प्रेम करतो
मी तुझ्यावर
सगळ्यांपासून लपतं

तुझं हे खोडकर वागणं
माझ्या मनात
तुझं प्रेम वाढवतं

एक कटाक्ष टाकून
मंद गोड हसून
मला तुझ्यात गुंतवतं .
===============
संजय एम निकुंभ , वसई
दि. २४ . ९ . १३ वेळ : १० .०० रा.