हुंडाबळी

Started by aap, September 25, 2013, 03:22:22 PM

Previous topic - Next topic

aap

हुंडाबळी

उंबरठ्यावरचे माप ओलांडून लक्ष्मी येते घरांत
पूर्वापार परंपरेचा असे हा प्रघात
मग लक्ष्मीला लक्ष्मीसाठी कां बरे छळतात
कुठे तरी कमी पडतात कां ते संस्कारात
हल्ली सर्वजण असतात विद्या विभूषित
मग कां बरे असतात त्यांची मने संकुचित
रोज उठून माहेरकडून पॆशाची मागणी करतात
स्वत;चे कर्तुत्व कां बरे विसरतात
आई वडील हाडाची काडे करून पॆसे जमवतात
सुखी रहावी मुलगी म्हणून लग्न थाटात करतात
स्वप्ने उराशी बाळगून आलेली असते ती आनंदात
पतीची मागणी स्वप्नाचा चुराडा करतो एका क्षणार्धात
रोजच्या मागण्यांना कंटाळून विचार येतात मनात
ती करते आत्मघात नाहीतर ते तिला संपवतात
                      सौ अनिता फणसळकर

पॆशासाठी आपण नसतो आपल्यासाठी पॆसा असतो . पॆसा वाचवणे म्हणजेच तो मिळवणे ,दगडा विटाच्या बँकेतल्या खात्यापेक्षा हाडा माणसाच्या बँकेतील खाती जास्त महत्वाची असतात
सौ अनिता फणसळकर             

Çhèx Thakare


Jayshri satpute

Mla tumchi kvita far avdli, khrch aaj hundya sathi lok far adun bstat...tumcha kvitetun distech pn kuthe tri he thambaylach hv.