ध्यान 1

Started by विक्रांत, September 25, 2013, 11:05:45 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

****ध्यान 1 ****
ध्यानाच्या अनेक पद्धती आहेत,कुठल्याही प्रकाराचे ध्यान असो .माणसाला त्याचा उपयोग,फायदा होतोच होतो .ज्याचा जसा पिंड असेल,संस्कार असतील त्याला ती पद्धती आवडते,त्यात वावगे काही नाही.ज्याने त्याने आवडेल तो मार्ग अनुसरावा. जबसे जागे तबसे सबेरा.हे इथे महत्वाचे आहे.
अष्टांग योगातील यम नियमादी शिड्यातील हि शेवटची पायरी आहे.खरतर आपण याला पायऱ्या म्हणतो म्हणून पण ते एकाच वेळी सुरु झालेले पालन असते.
यम हा आचारशुधीचा महत्वाचा टप्पा .तर नियम हा व्यक्तिगत शुचिता सांभाळणारा टप्पा .प्राणायाम प्राणशुद्धी, नाडीशुद्धी करून अंतर्गत सामर्थ्य देते तर आसने शरीर योगमार्गा साठी सशक्त बनविते.प्रत्याहार म्हणजे नियमन .धारणा म्हणजे एकाग्रता .आणि मग येते ते ध्यान . व आठवे समाधी
ध्यानाचा कुठला हि मार्ग अंगिकारला तरीही आणि माहित नसले तरीही यम नियम पालन केल्या वाचून पर्याय नसतो .कारण ध्यानमय जीवनाचा तो अपरिहार्य हिस्सा आहे.
(क्रमशः)
विप्र.