हा आयुष्याचा खेळ म्हणजे

Started by सतीश भूमकर, September 25, 2013, 11:51:18 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

हा आयुष्याचा खेळ म्हणजे त्या
रम्मीच्या डावासारखा असतो

जसाजसा पत्ता समोर पडतो
तसातसा डाव रंगतच जातो

कधी कधी आपण जिंकतो
आणि समोरचा पार हरतो

कधी कधी तर आपला
सगळा गेमच उलटा होतो


कधी तर फक्त राणीसाठी डाव अडतो
पण तो पत्ता आपल्या नशिबातच नसतो

त्याच वेळेस दुसरा कुणीतरी बाजी मारतो
आणि आपण सहज पुढचा पत्ता बघतो

तेव्हा तो खालचा आपल्याला येणारा
पत्ता नेहमीच बदामच्या राणीचा असतो

@सतीश भूमकर