मानवीमन

Started by aap, September 26, 2013, 05:47:58 PM

Previous topic - Next topic

aap

मानवीमन

मन म्हणजे अंत:करण ,अंत:करण म्हणजे मन. मनामनाचे विविध पॆलु ,कंगोरे उलगडणारे हे मन असते तरी कुठे तर ते असते माणसा माणसांत ज्याला मन नाही असा माणूस विरळाच . नात्या प्रमाणे मनाचे रंग बदलत जातात तसेच परिस्थिती नुसार ही मनाचे रंग बदलत असतात.
मुलांसाठी आईचे मन वात्सल्याने भरून येते , वयात आलेल्या मुलीची आईच्या मनात काळजी असते ,सासरी गेलेल्या मुलीच्या मनांत माहेरची ओढ असते ,मुले मोठी होऊन दूर गेली की, मन व्याकूळ होते .त्याच्या भेटीसाठी मन आतुर होते , मोठयाबद्दल मनात आदर असतो काहि माणसाच्या मनांत आकस आसतो . प्रेमात मन मोहरते ,कोमल होते ,काही जणांचे मन हळवे असते ,काही माणसांचे मन उंच भरारी घेणारे असते ,काहींचे फुलपाखरा सारखे बागडणारे असते ,परिस्थितीमुळे काहींचे मन उदास असते ,काहींचे दु:खी असते ,काहींच्या मनाचे सुकाणू भरकटलेले असते ,शिस्तीसाठी ,शिक्षेसाठी मन कठोर करावे लागते ,दॆन्याव्यस्थेत मन विटून जाते ,ताटा तुटीमुळे मन विरही होते ,वातावरणातील ताजेपणामुळे मन प्रसन्न होते , सणासमारंभात माणसाचे मन आनंदानी  भरून येते , मनांत द्वेष असतो ,मन वादळी असते ,मन शांत असते ,मन स्थिर असते ,मन चंचल असते ,मन स्वेर असते ,मन स्वच्छंदी असते ,
आशा या मानवरूपी मन मंदिरात असणारे हे मन म्हणजे न उलगडणारे कोडे आहे व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात ते काही खोटे नाही .

सौ . अनिता फणसळकर                           

Kiran Patil

khupach chan aahe ha lekh.......pan aaj kal chi lok chehra pahun man olkhnyacha pyant karata..