खरं प्रेम म्हणजे?? नक्की काय असतं...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., September 26, 2013, 06:17:10 PM

Previous topic - Next topic
खरं प्रेम म्हणजे??
नक्की काय असतं...!!

प्रेम करायच नसतं,
ते आपोआप होतं,
प्रेम देता येत नसतं,
ते नकळत वाटल्या जातं.....

कोणीतरी अनोळखी वळणावर,
आपली वाट पाहत असतं,
कोणीतरी स्वतःचे दुःख विसरुन,
आपल्याला सुखच सुख देतं.....

कोणीतरी परखं असुनही,
आपलंपण देवून जातं,
कोणीतरी प्रत्येक क्षणाक्षणात,
आपल्याला वेड्यासारखं शोधत राहतं.....

कोणीतरी ताहनलेल्या चातकासारखं,
आपली आठवण काढत असतं,
कोणीतरी तान्ह्या बाळासारखं,
आपल्यासाठी एकांतात रडतं.....

कोणीतरी मनाच्या कोप-यात,
आपली जागा राखुन ठेवतं,
कोणीतरी एकदा पाहण्यासाठी,
नेहमी मनातून झूरत राहतं.....

यालाच म्हणतात खरं प्रेम,
जिवापेक्षा जास्त प्रिय झालं असतं,
जे निस्वार्थपणे एकनिष्ट राहून,
स्वतःला पुर्णपणे झोकून निभवलं जातं.....

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक २६-०९-२०१३...
दुपारी ०४,२४...
© सुरेश सोनावणे.....

aspradhan